गाणं ह्रदयातलं
नमस्कार 🙏 "गाणं ह्रदयातलं" या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत! आठ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा ८८ वा वाढदिवस साजरा झाला. आशा भोसले यांच्या आवाजातील जादूने ज्या गाण्यानं मराठी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं असं अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे *कविवर्य म पां भावे* यांनी लिहिलेलं गाणं ज्याचे शब्द आहेत - *स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा* *गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा* या गाण्यामुळे म पां भावे हे नाव महाराष्ट्रात घराघरात पोचलं. भावे एकदा कामावरून घरी येत असताना त्यांच्या पुढे चालत असलेल्या दोन मुलींचा संवाद त्यांच्या कानावर पडला. थोडक्यात सांगायचं तर एक मुलगी दुसरीला सांगत होती कि अपूर्ण स्वप्न साकार होईपर्यंत ते पूर्ण करण्यासाठी आपण एकरूपतेने झटत असतो. पण एकदा का ते स्वप्न पूर्ण झालं कि मग सगळी गंमतच निघून जाते. हा संवाद ऐकून म पां भाव्यांना "गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा" ही दुसरी ओळ अगोदर सुचली आणि नंतर हे गाणं लिहून पूर्ण झालं. *रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या* *साशंक कल...